म्हापसा नगराध्यक्षांवर दुसर्‍यांदा अविश्‍वास ठराव

0
63

म्हापशाचे नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर यांच्यावर आठ नगरसेवकांनी अविश्‍वास ठराव दाखल केला आहे. अविश्‍वास ठरावाची प्रत काल संध्याकाळी पालिका संचालकांना सादर करण्यात आली. नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून कांदोळकर यांच्यावर अविश्‍वास ठराव दाखल होण्याची ही दुसरी वेळ आहे.

अविश्‍वास ठरावावर सूचक म्हणून मायकल कारास्को, अनुमोदक म्हणून दीपक म्हाडेश्री तसेच उपनगराध्यक्ष विजेता नाईक, रुही पत्रे, ऍड सुभाष नार्वेकर, सुभाष कळंगुटकर, आशिष शिरोडकर, गुरुदास वायंगणकर यांच्या सह्या आहेत.

गेल्यावेळी दाखल केलेल्या अविश्‍वास ठरावावेळी विरोधी गटाच्या नगरसेवक रूपा भक्ता यांनी तटस्थ भूमिका घेतल्यामुळे सात विरुद्ध सात अशी नगरसेवकांची संख्या बनली होती व कांदोळकर यांचे नगराध्यक्षपद वाचले होते.