म्हापसा अर्बन : खातेदारांना दावे दाखल करण्यासाठी मुदत

0
117

म्हापसा अर्बन बँकेच्या लिक्वीडेटरनी बँकेचे खातेदार आणि ठेवीदारांना दावे दाखल करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत दिली आहे. आरबीआयने म्हापसा अर्बन बँकेचा परवाना रद्द केल्यानंतर खातेदार, ठेवीदारांचे दावे निकालात काढण्यासाठी लिक्विडेटर म्हणून दौलत हवालदार यांची नियुक्ती केली आहे. खातेदार, ठेवीदारांनी नजीकच्या शाखेत दावे सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. बँकेत दावे सादर करताना कोविड नियमांचे पालन करण्याची सूचना करण्यात आली आहे. बँकेच्या लॉकधारकांनी १५ ऑगस्ट २०२० पर्यंत आपल्या वस्तू ताब्यात घ्याव्यात, अशी सूचना करण्यात आली आहे.