सहा जणांना अटक, पाच मुलींची सुटक
गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी काल म्हापसा शहरात असलेल्या व्हिनस व मार्स या दोन मसाज पार्लरवर छापे टाकले. यावेळी पाच मुलींची सुटका करण्यात आली. पोलिसांनी एकुण सहा जणांना अटक केली. मात्र चौघे प्रमुख आरोपी फरार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, सुटका केलेल्या मुली या नेपाळ, दार्जिलिंग व महाराष्ट्रातील आहेत. त्यांची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली आहे. प्रमुख आरोप राज मिश्रा, अभिषेक मिश्रा, सावियो डिसोझा, टोनी डिसोझा हे फरार असल्याचे अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी सांगितले.

दरम्यान, मसाज पार्लरच्या नावाखाली अनधिकृत व अनैतिक प्रकार चालत असल्याचा मुद्दा सध्या चालू असलेल्या विधानसभा अधिवेशनातही चर्चेला आला होता.