पेडे-म्हापसा येथील एका १७ वर्षीय तरुणीचे अपहरण केल्याप्रकरणी म्हापसा पोलीसांनी तरूणीच्या मावशीने दिलेल्या तक्रारीवरून सुनिल बाबू पाटील बेर्डेवाडी गडहिंग्लज (कोल्हापूर) याला अटक केली. याबाबत म्हापसा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित सुनिल पाटील आणि त्या तरूणीचे पूर्वी लग्न ठरले होते आणि त्या मुलीचे मूळ घरही गडहिंग्लज येथे आहे. तिचे आई-वडील तेथे राहतात तर ती तरूणी मावशीकडे राहते.