घाटेश्वरनगर म्हापसा येथील उतरणीवर झालेल्या अपघातात म्हापशातील सनद रमेश मोरजकर (२०) या एकतानगर येथे रहाणार्या युवकाचा मृत्यू झाला. म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सनद हा आसगाव येथील डीएमसी महाविद्यालयाकडून दुचाकीवरून उतरणीवरून जात असताना त्याचा तोल गेला. त्यामुळे दुचाकीसह त्याने बाजूल्या कुंपणाला धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला त्वरित म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल केले. त्यानंतर त्याला बांबोळी येथे गोमेकात नेले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.