>> कर्नाटक पोलिसांकडून अधिकारी व पर्यावरणप्रेमींचा अपमान
सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशानुसार कणकुंबी येथे गेलेल्या पहाणीसाठी गेलेल्या गोव्याच्या अधिकार्यांना कर्नाटक पोलिसांनी रोखले. यावेळी त्या ठिकाणी गेलेल्या राजेंद्र केरकर यांना व अधिकार्यांना पोलिसांनी अपशब्द वापरले. तसेच बैठकीसही गोव्याच्या अधिकार्यांना रोखण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाने दि. २४ फेब्रुवारी रोजी दिलेल्या आदेशानुसार काल गोव्यातर्फे एम. के. प्रसाद, महाराष्ट्राचे विजयकुमार थोरात व कर्नाटकतर्फे कृष्णाजी राव यांच्या संयुक्त टीमने कणकुंबी येथे भेट देऊन पाहणी केली. तसेच संयुक्त बैठक घेतली. . यावेळी पोलीस बंदोबस्त होता. या बैठकीच्या वेळी कर्नाटकच्या पोलिसांनी गोव्याचे जलसंसाधन खात्याचे कनिष्ठ अभियंते आग्नेलो फर्नांडिस व बिपीन कारापूरकर यांच्याकडे ओळखपत्राची मागणी केली. तसेच अपशब्द वापरले. त्यांची ओळखपत्रे हिसकावून घेतली. त्यांना बैठकीला प्रवेश नाकारला. मात्र कर्नाटकच्या २० अधिकार्यांना प्रवेश दिला. यावेळी त्यांनी पर्यावरण कार्यकर्ते राजेंद्र केरकर यांनाही अपशब्द वापरल. कर्नाटकाला ही संयुक्त पाहणी नको होती. त्यांचा डाव उघडा होणार असल्याने कर्नाटक अशी बेकायदा कृत्ये करत असल्याचा आरोप श्री. केरकर यांनी केला.
निंदनीय प्रकार ः मुख्यमंत्री
कणकुंबी येथे जो प्रकार घडला तो निंदनीय असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशानुसार तिन्ही राज्याच्या सदस्यािीन बैठक निश्चित केली होती. यावेळी सामंजस्याची भाषा वापरता येत होती. मात्र अरेरावी करणे पूर्ण चुकीचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र या त्रिसदस्यीय अहवालानंतर गोव्याची बाजू निश्चित्तपणे भक्कम होणार असल्याचा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.