म्हादई लवादाकडून कर्नाटकला कानपिचक्या

0
102

म्हादई सुनावणीत काल कर्नाटकातर्फे कतरगी यांनी कणकुंबी येथील कळसा कालव्याच्या कामासंदर्भात कोणत्याही प्रकारचे पर्यावरणीय दाखले मिळवलेले नाहीत याबाबत कसलीही भीड न ठेवता चालू असलेल्या कामाचे समर्थन केले.
सदर कामाकडे गोव्यावर कसल्याच प्रकारचा परिणाम जाणवणार नाही. तसेच कोणताही अवमान होणार नसल्याचे युक्तीवादावेळी कर्नाटकच्या वकिलांनी वारंवार स्पष्ट केले.

बेकायदा कामाचे समर्थन करताना कर्नाटकाने केलेल्या बेकायदा गोष्टींना एक प्रकारे समर्थनच देण्याचा प्रयत्न केला.
यावेळी लवादाच्या सदस्यांनी कर्नाटकाची कान उघडणी करताना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही प्रकारचे कामकाज करता येणार नाही हा आदेश कर्नाटकासाठी बंधनकारक आहे. याकडे लक्ष वेधले. तसेच कर्नाटकाने ज्यापद्धतीने काम चालूच ठेवले ते सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारे असल्याचे कर्नाटकाच्या निदर्शनास आणून दिले.