‘म्हादई प्रवाह’मुळे कर्नाटक पाणी वळवणार नाही

0
6

>> मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचा दावा

म्हादई प्रवाहची (प्रोग्रेसीव्ह रिव्हर ओथॅरिटी फॉर वेल्फेअर अँड हार्मनी) स्थापना झालेली असल्यामुळे केंद्र सरकार कर्नाटकला म्हादई नदीचे पाणी वळवण्यास परवानगी देऊ शकत नसल्याचा दावा काल गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला.

दरम्यान, म्हादई प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी आज सोमवारी सर्वोच्च न्यालयात होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली. गोव्याचे ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम व अन्य वकील या सुनावणीसाठी दिल्लीला गेले असल्याची माहिती यावेळी मुख्यंत्र्यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयात आम्ही म्हादई प्रश्नी आमची बाजू भक्कमपणे मांडणार आहोत. सर्वोच्च न्यायालयाने तसेच केंद्राने स्थापन केलेल्या म्हादई प्रवाहावर पूर्ण विश्वास आहे असेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.