म्हादई पाणीतंटा प्रश्नावर महत्त्वपूर्ण सुनावणी आजपासून सुरू होत आहे. मात्र, माजी ऍडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी यांना या खटल्याची सूत्रे हाताळण्यास केंद्राने कालपर्यंत अधिकृत परवानगी दिली नव्हती. यामुळे नवे ऍडव्होकेट जनरल गोव्याची बाजू मांडणार आहेत. यापूर्वी गोव्यातर्फे नाडकर्णी यांनी २३१ परिच्छेदांसह २१० पानांचे सादरीकरण केले आहे. या उत्तरात कर्नाटकाच्या सर्व बेकायदा कृत्यांचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे. मात्र, त्यांना भारताचे अतिरिक्त सॉलीसीटरपदी बढती मिळाल्याने गोव्याची बाजू त्यांनी मांडण्याची विनंती राज्य सरकारने केंद्राकडे केली होती. ती अद्याप मिळालेली नाही. त्यांच्या गैरहजेरीत कर्नाटक आपला डाव साधण्याचा प्रयत्न करणार आहे.