म्हादईसाठी सरकारने पाऊल उचलावे ः राज्यपाल

0
136

>> मदत करण्याची दर्शविली तयारी

आपण म्हादई संवर्धनासाठी करायचे हवे तेवढे काम केले आहे. सरकारने यापुढे म्हादईसाठी आवश्यक पाऊल उचलले पाहिजे. आपणाकडे मदत मागितल्यास आवश्यक मदत करण्याची तयारी आहे. अन्यथा, आपण या विषयावर बोलू इच्छित नाही, असे प्रतिपादन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दोनापावल येथे एनआयओच्या एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना काल केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे म्हादईच्या विषयाबाबत एक नोट चिठ्ठी होती. आपण त्यानंतर घडलेल्या घडामोडी बघितल्या आहेत. म्हादई हा वादाचा विषय बनलेला आहे. त्यामुळे या विषयावर आणखीन प्रश्‍न विचारू नका, असेही मलिक म्हणाले.
समुद्रामध्ये प्लॅस्टिक व इतर नको असलेल्या वस्तू टाकल्या जात आहे. समुद्राचे रक्षण करण्याची गरज आहे. समुद्रातील जीव, जंतू, वनस्पतीचा औषधासाठी वापर केला जाऊ शकतो. संशोधन कार्यासाठी निधी वाढविण्याची नितांत गरज आहे. आपल्याकडे काही गोष्टीवर नाहक खर्च केला जातो. संशोधनासाठी मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असेही मलिक यांनी सांगितले.
मलिक यांनी देशात गाजणार्‍या सीएए यासंबंधीच्या प्रश्‍नावर राजकीय विषय असल्याचे सांगून भाष्य करण्याचे टाळले.