म्हादईसाठी उद्या मानवी साखळी

0
9

‘सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा’तर्फे म्हादई प्रश्नाबाबत जनजागृतीसाठी शनिवार दि. 20 मे रोजी मिरामार ते सांता मोनिका जेटी पाटो पणजी दरम्यान मांडवी नदीच्या किनाऱ्यावर सात किलोमीटरची मानवी साखळी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, अशी माहिती प्रा. प्रजल साखरदांडे यांनी दिली. म्हादई नदीच्या संवर्धनासाठी जनजागृतीसाठी सात किलोमीटरच्या परिसरात विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे. या मानवी साखळीमध्ये राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभागी व्हावे. या कार्यक्रमात सुमारे 8 हजार लोक सहभागी होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.