म्हादईप्रश्नी याचिकेवर शुक्रवारी होणार सुनावणी

0
3

सर्वोच्च न्यायालयात म्हादई प्रश्नी याचिकेवर शुक्रवार 30 जानेवारी रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. गेल्या 23 जानेवारीला म्हादई प्रश्नी याचिकेवर सुनावणी होणार होती; परंतु याचिका सुनावणीला आली नाही. गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तीन राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात म्हादई प्रश्नी याचिका दाखल केलेल्या आहेत. तिन्ही राज्यांनी म्हादई जल जलतंटा लवादाच्या 2018 च्या पाणी वाटपाच्या निवाड्याला आव्हान दिले आहे, तसेच, गोवा राज्याने कर्नाटकाच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली आहे.