कर्नाटकने म्हादई नदीचे पाणी वळवल्यास म्हादई नदीवरील जैव विविधतेवर काय परिणाम होईल यासंबंधी अभ्यास करण्यासाठी मेसर्स डीएच्आय् (इंडिया) वॉटर ऍण्ड एनव्हार्रमेन्ट प्रा. लिमिटेड या कंपनीची नियुक्ती करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल सांगितले. १ कोटी ३४ लाख ८३ हजार २०० रु. देण्याचे ठरले आहे. हा अहवाल आल्यानंतर म्हादई जल तंटा लवादासमोर गोव्याची बाजू बळकट होण्यास मदत होणार आहे.
म्हादई नदीवरील जैव विविधता, नदीतील मत्स्यजीव, परिसरातील अन्य जीव, विविध मोसमात तेथे येणारे स्थलांतरीत पक्षी आदींचाही अभ्यास केला जाणार आहे. त्याशिवाय पावसाळा तसेच नदीतून वाहून जाणारे पावसाचे पाणी यांचा अभ्यास, म्हादई नदीला येऊन मिळणार्या मांडवी व जुवारी नद्या व त्यांचे प्रवाह यांचा अभ्यास व सर्वे असे काम केले जाणार आहे.
या प्रकल्पासाठी अर्थखात्याची मान्यता घेण्यात आली नसल्याचे बैठकीत मंत्र्यांच्या नजरेत आणून देण्यात आले. वरील कंपनीची सदर कामासाठी नामांकन तत्वावर निर्माण करण्यात आल्याचे व सदर कंपनीने यापूर्वी तशा प्रकारच्या प्रकल्पांवर काम केल्यानेच अशा प्रकारे त्यांची निवड करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
वरील प्रकरणी अर्थ खात्याने जे मुद्दे उपस्थित केले होते. त्याबाबत योग्य तो खुलासा करण्यात आलेला असून मंत्रिमंडळ बैठकीत त्यासंबंधीच्या शेर्याद्वारे (नोट) सदर निर्णयावर पुन्हा शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.