राज्यातील बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन हडप प्रकरणातील एक मुख्य संशयित मोहम्मद सुहैल ऊर्फ मायकल या एसआयटीने अशाच एका प्रकरणात सहाव्यांदा काल अटक केली. यापूर्वी पाच वेळा अटक करून त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती. म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने सुहैल याला सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.