मोले येथील ट्रक-दुचाकी अपघातात एकजण ठार

0
249

मोले येथील मुख्य रस्त्यावरील मेलका-धारबांदोडा येथे काल गुरूवार दि. ८ रोजी ट्रक व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार सुभाष रामचंद्र खुटकर (५२) हे ट्रकखाली सापडून ठार झाले.

कुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच-११ सीएच – ५५०७ हा ट्रक व जीए-१२ बी-०६६८ या दुचाकीत हा अपघात झाला. सुभाष खुटकर हे तांदुळ घेऊन दुचाकीने घरी परतत होते. मेलका येथे गुरांचा कळप रस्त्यावर बसला होता, त्यामुळे एक चारचाकी गाडी थांबली होती. या गाडीच्या पुढे जाण्याचा प्रयत्न सुभाष खुटकर यांनी केला असता, त्यांचा तोल गेला व ते समोरून येणार्‍या मालवाहू ट्रकच्या खाली सापडले.
शवचिकित्सेनंतर त्यांच्यावर काजूमळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. सुभाष खुटकर हे मोलेचे माजी पंच होते.