मोरोक्कोमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या भूकंपात आतापर्यंत 2 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 1400 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. किंग मोहम्मद सहावा यांनी 3 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून पीडितांना अन्न, निवारा आणि इतर मदत देण्याचे आदेश दिले आहेत. या भूकंपाची तीव्रता 7.2 इतकी होती. तथापि, यूएस भूगर्भीय सर्वेक्षणाने त्याची तीव्रता 6.8 सांगितली आहे. तसेच या भागात 120 वर्षांतील हा सर्वात शक्तिशाली भूकंप असल्याचे सांगितले. या भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या. पोर्तुगाल आणि अल्जेरियापर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले.