मंगळवारी म्हापसा पोलीसात गणेशपूरी म्हापसा येथील एका उच्च माध्यमिक विद्यालयात शिकणार्या पाच विद्यार्थ्यांचे त्यांच्याच वर्ग सहकारी विद्यार्थ्यांने आपल्या एका अल्पवयीन मित्राच्या सहाय्याने ६० हजारांचे पाच मोबाईल चोरल्याची तक्रार दिली होती. या प्रकरणी म्हापसा पोलीसांनी या संशयितास अटक केली होती. त्यांना काल म्हापसा न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविण्यात आले. गंगानगर खोर्ली-म्हापसा येथील संशयित आरोपी मेहबुब दस्तगीर मुल्लीगर (१८) व त्याच्या अल्पवयीन साथीदारास अटक केली होती.