मोपा विमानतळासाठी केंद्राकडून ३ हजार कोटी रुपये

0
161

ग्रीनफिल्ड विमानतळ प्रकल्पांतर्गत गोव्यातील मोपा विमानतळासाठी केंद्र सरकारने ३ हजार कोटींची तरतूद केली आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री जी. एम. सिद्धेश्वर यांनी काल लोकसभेत ही माहिती दिली. मोपा विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. कन्नूर (केरळ), नवी मुंबई (महाराष्ट्र), कुशीनगर (उत्तर प्रदेश) येथेही आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिरडी येथेही विमानतळ विकसित करण्यात येणार आहे. दरम्यान, देशातील १८ राज्यांतील पन्नास नगरे/शहरे ही हवाई मार्गाने जोडली जाणार असल्याचेही सांगण्यात आले. या राज्यांत आसाम, अरुणाचल प्रदेश, उदिशा, छत्तिसगढ, झारखंड, बिहार, राजस्थान यांचा समावेश असेल, असे नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे. देशात १५ ठिकाणी ग्रीनफिल्ड विमानतळ उभारले जाणार आहेत. पैकी चार कर्नाटकात, तीन महाराष्ट्रात, दोन केरळात तर पश्‍चिम बंगाल, गोवा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, सिक्किम आणि पुडुचेरी येथे प्रत्येकी एक विमानतळ असेल.