मोपा विमानतळावर 83 लाखांचे सोने जप्त

0
5

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करीचा दुसरा प्रकार काल उजेडात आला. या सोने तस्करी प्रकरणी सुंदर रमण, अप्पास मंथिरी आणि जयप्रकाश नामक तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून 83 लाख रुपयांचे 1.3 किलो सोने जप्त करण्यात आले. संशयित आरोपी मुंबईतून मोपा विमानतळावर आले होते. तिघेही तामिळनाडू येथील रहिवासी आहेत. गेल्या 22 ऑक्टोबर 2023 रोजी मोपा विमानतळावर सोने तस्करीच्या पहिल्या प्रकरणाची नोंद झाली होती. त्यावेळी डीआरआयने 5.7 किलो सोने, आयफोन मिळून एकूण 4 कोटी रुपयांचा ऐवज जप्त केला होता.