मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मोपा विमानतळ लिंक रोड प्रकरणी राष्ट्रीय महामार्ग कायद्यांतर्गत भूसंपादनाला आव्हान देणारी याचिका काल फेटाळली.
मोपा विमानतळ लिंक रोड प्रकरणी सुरुवातीला पंचायत संचालकांनी वारखंड-नागझर पंचायतीच्या काम बंद नोटिसीला स्थगिती दिली होती. त्यानंतर पंचायत संचालकांनी या प्रकरणी सुनावणी घेऊन मोपा लिंक रोडचे काम बंद ठेवण्याचा जो आदेश पंचायतीने काढला होता, तो मागे घ्यावा, असा निकाल दिला होता.
या निवाड्याला पीडित जमीनमालकांनी गोवा खंडपीठात आव्हान दिले होते. जमीनमालकांनी मोपा लिंक रोडसाठी झाडे तोडण्यास आणि भूसंपादनास विरोध केला होता, तसेच जमिनीला योग्य मोबदला मिळावा, अशी मागणी केली होती. या प्रकरणी सुनावणीअंती गोवा खंडपीठाने लिंक रोडला आव्हान देणारी याचिका काल फेटाळून लावली.