मोपा लिंक रस्ता प्रकरणी
१ एप्रिलला निवाडा जाहीर

0
21

पंचायत संचालनालयाने मोपा लिंक रस्ता प्रकरणी सुनावणी काल पूर्ण केली असून, येत्या १ एप्रिल रोजी अंतिम निवाडा जाहीर केला जाणार आहे.

मोपा विमानतळाला जोडणार्‍या या रस्त्याच्या बांधकामाला स्थानिक नागरिकांकडून विरोध केला जात आहे. वारखंड-नागझर ग्रामपंचायतीने मोपा लिंक रस्त्याचे काम बंद करावे, असा आदेश काढला आहे. त्यानंतर या रस्त्याचे बांधकाम करणार्‍या ठेकेदाराने ग्रामपंचायतीच्या आदेशाला पंचायत संचालनालयाकडे आव्हान दिले आहे. पंचायत संचालनालयाने ग्रामपंचायतीच्या आदेशाला १ एप्रिलपर्यंत स्थगिती दिलेली आहे.

पंचायतीला मोपा लिंक रस्त्याचे बांधकाम बंद करण्याचा अधिकार नाही. पंचायतीचा आदेश चुकीचा आहे, असा दावा ठेकेदाराने केला.
पंचायतीकडे रस्ता प्रकरणी तक्रार करण्यात आल्याने नोटीस जारी केली आहे, असा युक्तिवाद पंचायतीच्या वकिलांनी केला आहे.