इंडिगो एअरलाइन्सने मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दररोज १२ आणि १६८ साप्ताहिक नवीन उड्डाणे जाहीर केली आहेत. येत्या ५ जानेवारी २०२३ पासून विमानतळावरील विमान वाहतुकीला प्रारंभ होणार आहे. इंडिगो कंपनीचे आत्तापर्यंतचे सर्वांत मोठे नवीन स्टेशन लॉंच जाहीर केले आहे. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाला नवी दिल्लीसह भारतातील आठ शहरांशी जोडण्यात येणार आहे. त्यात मुंबई, जयपूर आणि बेंगळुरू आदी विमानतळांचा समावेश असेल, असे कंपनीने म्हटले आहे.