मोदी सरकार ३४ कामगार कायद्यांमध्ये दुरुस्ती करणार

0
82

>>केंद्रीय कामगारमंत्री बंडारू दत्तात्रेय

 

केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एन्‌डीए सरकारचा ३४ कामगार कायद्यात दुरुस्ती घडवून आणून ते सुटसुटीत करण्याचा विचार असून संसदेत त्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात येणार असल्याचे केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी काल येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
देशभरातील कंत्राटी कामगारांना रोजगाराची हमी नाही. त्यामुळे त्यांना रोजगारासंबंधीची आवश्यक ती हमी व सुरक्षा देण्यावर सरकार भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशभरात जी कंत्राटी कामगार पध्दत आहे त्यासंबंधी संसदेच्या सर्व सदस्यांची मते सरकारने जाणून घेतली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.