काठमांडू येथे होणार असलेल्या सार्क परिषदेतवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भेटीची शक्यता भारताकडून नाकारण्यात आली नाही. मोदी हे जास्तीत जास्त आशियाई नेत्यांशी भेट घेणार आहेत, असे भारताकडून स्पष्ट करण्यात आले. मोदी दि. २५ रोजी काठमांडूला रवाना होणार असून सार्क परिषद दि. २६ व दि. २७ असे दोन दिवस असेल. परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते सयद अकबरूद्दीन यांनी सांगितले की, भारताला पाकिस्तानशी सहकार आणि शांततापूर्ण संबंध ठेवण्यातच रस आहे.