महाराष्ट्रातील दोन कार्यक्रमांदरम्यान काल पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात शाब्दीक चकमक उडाली. मोदी यांनी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन केले. त्याआधी चव्हाण यांनी अप्रत्यक्षरित्या मोदी यांच्यावर टीका केली होती. कोळसा व गॅस (वायू) च्या तुटवड्यामुळे महाराष्ट्रातील विद्युत प्रकल्प व्यवस्थित चालत नसल्याचा चव्हाण यांच्यासमोर उल्लेख केला होता. विशेष आर्थिक विभाग व उत्पादन क्षेत्रात महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचे राज्य असल्याचा दावाही त्यांनी केला होता. मात्र त्यानंतर नवी मुंबई येथील एसईझेड प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी मोदी म्हणाले, ‘कोळसा व गॅसच्या तुटवड्यामुळे वीज प्रकल्प ठीक चालत नाही हे चव्हाण यांचे म्हणणे खरे आहे. परंतु ही तक्रार त्यांनी आता का केली, याआधी का नाही केली?’