‘मोदी का परिवार’ टॅगलाईन आता हटवा

0
14

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया खात्यावरील नावासमोर ‘मोदी का परिवार’ अशी टॅगलाईन देत नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दर्शवण्याचा प्रयत्न केला होता. भाजपच्या मोठ्या नेत्यांनीही त्यांच्या नावासमोर ‘मोदी का परिवार’ अशी टॅगलाईन जोडली होती. आता सोशल मीडिया खात्याच्या नावासमोरील मोदी का परिवार ही टॅगलाईन हटवा, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केली. एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत त्यांनी ही विनंती केली.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भारतातील जनतेने माझ्याबद्दल आपुलकी दाखवत त्यांच्या सोशल मीडियावर खात्यावरील नावासमोर ‘मोदी का परिवार’ अशी टॅगलाईन जोडली होती. त्यातून मला खूप पाठबळ मिळाले. देशातील जनतेने तिसऱ्यांना एनडीएला बहुमत देत विजयी केले. तसेच आता ‘मोदी का परिवार’ ही टॅगलाईन हटवण्याची विनंती करतो, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.ही टॅगलाईन हटवली तरी आपल्यातील ऋणानुबंध कायम राहतील. भारताच्या प्रगतीसाठी झटणारा अतूट असा आपला परिवार आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

पाटणा येथे 3 मार्चला सभेत लालूप्रसाद यादव यांनी मोदींवर निशाणा साधला होता. मोदी घराणेशाहीवर टीका करतात, पण त्यांना स्वतःचं कुटुंब का नाहीय? असा तिखट प्रश्न यादव यांनी विचारला होता. त्याचे उत्तर भाजपने मोदी का परिवार या टॅगलाईनने दिले होते.