पंतप्रधान नरेंद्र मोजी उद्या मंगळवार दि. 14 मे रोजी वाराणसीमध्ये उमेदवारी दाखल करणार आहेत. तत्पूर्वी आज 13 मे रोजी त्यांच्या विशाल ‘रोड शो’चे आयोजन करण्यात आले आहे.
मोदी यांच्या उमेदवारीसाठी 25 ते 30 समर्थकांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये विविध जाती, जमातींचे लोक आहेत. यांना समर्थक बनवून मोदी हे कोणत्याही एका जाती-धर्माचे नसून त्यांना सर्व जाती-धर्माचा पाठिंबा मिळत आहे, असा संदेश दिला जाणार आहे.पंतप्रधानांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान भाजप आणि एनडीएचे सर्व वरिष्ठ नेते वाराणसीला पोहोचणार आहेत.