पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता रेडिओद्वारे लोकांच्या संपर्कात राहायचे ठरवले आहे. रेडिओद्वारे ते सामान्य लोकांच्या सूचना ऐकण्याचे तसेच त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यावर विचार करीत आहेत. रेडिओद्वारे लोकसंपर्क कसा ठेवावा याविषयी त्यांनी लोकांकडून विचार मागवले आहेत. काल ट्विटर संदेशाद्वारे त्यांनी याबाबत आवाहन केले. रेडिओवरील हा कार्यक्रम कशा स्वरुपात असावा, त्यावर काय विषयांची चर्चा व्हावी, लोकांनी कशाप्रकारे प्रश्न मांडावेत, याबाबत सूचना मागितल्या आहेत. इच्छुकांनी सूचना, सल्ले ुुु.चूर्सेीं.खप या संकेतस्थळावर सादर करावेत असे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले. पंतप्रधानांनी आतापर्यत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, ई-मेल, एसएमएसद्वारे लोकांपर्यंत पोचण्याचे प्रयोग केले आहेत.