मोदींच्या रेडिओ भाषणाविरोधात कॉंग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

0
76

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेडिओवर भाषण केल्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्याकडून झालेला हा प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर असल्याप्रकरणी विरोधी कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली आहे. अखिल भारतीय कॉंग्रेसच्या कायदा विभागाचे सचिव के. सी. मित्तल यांनी ही तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त व्ही. एस. संपथ यांना सादर केली आहे. येत्या विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर मोदी यांचे भाषण रेडिओवरून प्रसारित केल्याने संबंधित निर्देशांचा भंग झाल्याचा दावा कॉंग्रेसने केला आहे. मोदी यांचे ‘मन की बात’ हे भाषण भाजपच्या निवडणूक प्रचाराचा भाग होता असेही कॉंग्रेसने म्हटले आहे.