मोदींच्या भेटीला भाजप प्रदेशाध्यक्ष

0
2

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी नवी दिल्ली येथे काल भेट घेतली. प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी घेतलेल्या पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या विषयावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. पक्ष संघटना आणि विकासाच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष नाईक यांनी दिली.