मोदींचे ‘निमंत्रण’ महागात; थरूर यांचे प्रवक्तेपद काढले

0
87

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानासाठी दूत बनण्याचे निमंत्रण केरळचे कॉंग्रेस खासदार शशी थरूर यांनी स्वीकारल्यानंतर सोनिया गांधी यांनी शिस्तभंग कारवाई म्हणून त्यांचे प्रवक्तेपद काढून घेतल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.दरम्यान, थरूर यांच्याविरोधात केरळ प्रदेश कॉंग्रेसच्या अनेक तक्रारी होत्या. ते पक्षाच्या ध्येयधोरणाविरुद्ध वागत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या, असे म्हणून कॉंग्रेसने निर्णयाचे समर्थन केले. त्याची चौकशी करून शिस्तपालन समितीने वरील शिफारस केल्याचे पक्षाच्यावतीने सांगण्यात आले. दरम्यान, थरूर यांनी आपण सच्चा कॉंग्रेस कार्यकर्ता असून श्रीमती गांधी यांचा आदेश स्वीकारत असल्याचे सांगितले. मात्र आपणासही बाजू मांडण्याची संधी द्यायला हवी होती, असे ते म्हणाले.