ऍडॉल्फ हिटलर हा लोकशाही मार्गानेच निवडून आला होता. परंतु कालांतराने त्याने काय केले ते सार्या जगाने पाहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तीन महिन्यांची कार्यपद्धती पाहता त्यांची पावले हिटलरच्या कार्यपद्धतीच्या दिशेने पडत असल्याचे जाणवत आहे अशी बोचरी टीका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल येथे केली. कॉंग्रेसच्या चांगल्या योजना बंद पाडण्याचे सत्र मोदी यांनी सुरू केले आहे. मोदींच्या कामाची पद्धत एकाधिकारशाहीची असल्याचे चव्हाण म्हणाले.