कॅश फॉर क्वेश्चन प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. 9 नोव्हेंबर रोजी या संदर्भात आचार समितीची बैठक झाली. समितीच्या दहापैकी 6 सदस्यांनी महुआ मोईत्रांची लोकसभेतून हकालपट्टी करण्याच्या बाजूने मतदान केले. 4 सदस्यांनी विरोधात मतदान केले. हा अहवाल शुक्रवार दि. 10 नोव्हेंबर रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सादर केला जाईल. महुआंच्या हकालपट्टीला विरोध करणाऱ्या समितीच्या चार सदस्यांनी हा अहवाल पक्षपाती आणि खोटा असल्याचे सांगितले.