>> पंतप्रधान मोदींचा ‘मन की बात’मध्ये चीनला इशारा
आकाशवाणीच्या माध्यमातून काल दुपारी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’कार्यक्रमात देशवासीयांना संबोधित करताना भारत-चीन वादासह कोरोना, लॉकडाऊन, अनलॉक, मान्सून अशा विविध बाबींवर भाष्य केले.
भारत-चीन वादाच्या पार्श्वभूमीवर बोलताना पंतप्रधान मोदींनी लडाखमध्ये चीनला भारताने एकदम चोख प्रत्त्युत्तर दिले आहे. आपल्या देशाकडे डोळे वटारून पाहणार्यांना भारताने धडा शिकवला आहे. भारतमातेकडे डोळे वर करुन पाहाल तर तुमचे डोळे काढून घेण्याची ताकद आमच्यात आहे हे भारतीय जवानांनी दाखवून दिले. भारताला मैत्री निभावणे माहीत आहे तसेच डोळ्यात डोळे घालून पाहून चोख उत्तर देणेही माहिती आहे. असे सांगितले.
पंतप्रधानांनी, ह्या वर्षी अम्फान, निसर्ग अशी चक्रीवादळे आली, शेजारील देश कुरापती काढत आहे. परंतु ह्या सगळ्या संकटांना आपण धैर्याने तोंड देत आहोत. वर्षाला ५० अशी आव्हाने आली तरी डगमगून जाऊ नका असे आवाहन केले.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी लहान मुलांनी आपल्या आजी-आजोबांची मोबाईलवर मुलाखत घ्यावी. त्यांनी विविध प्रश्न विचारावेत. मुलांसाठी हा एक आठवणींचा ठेवा असेल असे ते पुढे म्हणाले. त्यासाठी काही प्रश्नही त्यांनी सूचवले आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांची जन्मशताब्दी सुरू होत असल्याचे सांगून स्तुती केली.