मेरशी येथे टोळीयुद्धातून खून

0
5

गुंडगिरीमुळे कुप्रसिद्ध बनलेल्या चिंबल व मेरशी या गावात गुन्हेगारांच्या टोळ्या पुन्हा एकदा सक्रीय झाल्या असल्याचे दिसून येत आहे. शनिवारी रात्री मेरशी येथील विशाल गोलतकर (39) याचा खून करून मृतदेह वयलेभाट-मेरशी येथील झुडपात टाकून देण्यात आल्याचे आढळून आले. हा खून टोळीयुद्धातून झाला आहे.

वयलेभाट-मेरशी येथील रस्त्याच्या बाजूला मयत विशाल गोलतकर याची बुलेट दुचाकी उभी असल्याचे काहीजणांनी पाहिल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. नंतर पोलिसांनी जवळपासच्या झुडपात शोध घेतला असता त्यांना तेथे मयत विशाल गोलतकर याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सापडला.
6 जणांना ताब्यात
जुने गोवे पोलिसांनी या प्रकरणी 6 संशयितांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी केवळ सहा तासांत खुनाचा छडा लावण्यात यश मिळवले आहे.