गोव्याच्या माजी राज्यपाल, साहित्यिक श्रीमती मृदुला सिन्हा यांच्या पार्थिवावर काल नवी दिल्लीत अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रीमती मृदुला सिन्हा यांचे बुधवार १८ नोव्हेंबरला निधन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री, भाजपा नेत्यांनी पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली.