मृत्यूनंतर नेत्रदानासाठी १४०० जण इच्छुक

0
92

सर्वांकडून त्याविषयी गोमेकॉला पत्र
राज्यातील १४०० जणांनी आपल्या मृत्यूनंतर डोळे दान करण्यासंबंधीचे पत्र गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला दिल्याचे सांगून आतापर्यंत मृत झालेल्यांचे डोळे काढून दोघांना दृष्टी दिल्याची माहिती आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिली.
नेत्र पेढीत २६ डोळे होते. रुग्ण न मिळाल्याने दोनच डोळ्यांचा वापर केला. राहिलेले २४ डोळे पुणे येथील नेत्रपिढीला दान करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मृत झाल्यानंतर सहा तासांच्या आत डोळे काढावे लागतात, असे ते म्हणाले.
अपघातात मृत झालेल्यांचे अवयव काढून तशाच अवयवांची आवश्यकता असलेल्या रुग्णांना जीवदान देण्याचा विचार आहे. संबंधितांच्या नातेवाईकांना विश्‍वासात घेऊनच ते करावे लागेल. त्यासाठी कायदाही करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
गोव्यात साक्षरता अधिक असल्याने हे शक्य होऊ शकेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
मेडिक्लेमवर सहा महिन्यात ५ कोटी खर्च
सुपर स्पेशालिटी सुरू केल्याने गेल्या पाच-सहा महिन्यांच्या काळात मेडिक्लेम योजनेवर फक्त ५ कोटी रुपये खर्च केले. वरील योजनेवर वर्षाकाठी किमान २० कोटी रुपये खर्च करावे लागत होते, अशी माहिती पार्सेकर यांनी दिली.