मुलीवर अत्याचारप्रकरणी संशयितास सक्तमजुरी

0
1

येथील पणजी बाल न्यायालयाने एका 13 महिन्याच्या मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणात संशयित आरोपी विजय कटप्पा बिरादर (29) याला दोषी ठरवून त्याला 20 वर्षे सक्तमजुरी आणि 9.5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

फोंडा पोलीस स्थानक क्षेत्रात 31 ऑक्टोबर 2015 रोजी ही घटना घडली. त्यावेळी आरोपीचे वय 19 वर्षे होते. आरोपीने त्या मुलीला एका वाहनात नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. आरोपीला आयपीसी, गोवा बाल कायदा आणि पॉक्सोच्या विविध कलमांखाली शिक्षा दिली आहे. बालन्यायालय पणजीच्या न्यायाधीश सई प्रभुदेसाई यांनी हा निवाडा दिला. या प्रकरणाचा तपास फोंड्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक आणि पणजीचे विद्यमान उपअधीक्षक सुदेश नाईक यांनी केला.