कसलये-उसगाव येथील 4 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणी फोंडा पोलिसांनी अटक केलेल्या संशयित बाबासाहेब अल्लाड व पूजा अल्लाड यांना गुरुवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने दोन्ही संशयितांना आणखी 4 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. या खून प्रकरणी अटक केलेल्या दोन्ही संशयितांना यापूर्वी न्यायालयाने 6 दिवस पोलीस कोठाडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. गुरुवारी कोठडी संपुष्टात आल्याने पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना आणखी चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.