>> पेडा-आंबेली येथील घटना
पेडा, आंबेली येथील फिडेलीस मारयानो (७६) या आपल्या वृद्ध वडिलांचा त्यांच्या मुलीनेच लाकडी दंडुक्याने डोक्यावर प्रहार करून खून केला. ही घटना काल रविवारी पहाटे ४ च्या दरम्यान उघड झाली.
फिडेलीस यांची ५० वर्षांची मुलगी मारयानी ही मनोरूग्ण असून रागाच्या भरात वडिलांच्या डोक्यावर तिने लाकडी दंडुका हाणला. डोक्याला जबर मार बसून मोठा रक्तत्राव झाल्यामुळे फिडेलीस यांचा मृत्यू झाला.
मारयानी हिचा विवाह १९९७ मध्ये झाला होता. पण पतीशी पटत नसल्याने २००० साली पतीने घटस्फोट दिल्यानंतर ती वडिलांच्या घरी राहत होती. तेव्हापासून तिची मानसिक स्थिती बिघडली होती. तिचे औषधोपचार सुरू होते. पण मानसिक तोल बिघडल्याने या तीन महिन्यांपासून ती औषधे घेत नव्हती.
त्यांचे शेजारी काल रविवारी सकाळी ईस्टरच्या प्रार्थनेवेळी निघण्याच्या तयारी असताना ही घटना उघडकीस आली.