उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांची चिंताजनक उपचारासाठी त्यांना दिल्लीतील मेदांता इस्पितळात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.
मुलायमसिंह यादव यांची गेल्या काही दिवसांपून सतत प्रकृती खालावत आहे. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने जूनमध्ये त्यांना गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्यांच्यावर इस्पितळाच्या सर्वसाधारण वॉर्डमध्ये उपचार सुरू होते. परंतु, काल दुपारी अचानक त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना तातडीने आयसीयूमध्ये हलवण्यात आले. तपासणीत त्यांची ऑक्सिजन पातळी आणि रक्तदाब कमी झाल्याचे आढळून आले.
दरम्यान, मुलायम सिंह यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळाल्यानंतर अखिलेश यादव आणि डिंपल यादव मेदांता रुग्णालयात धाव घेतली.
यासोबतच शिवपाल सिंह यादवही मेदांता हॉस्पिटलमध्ये पोहोचले आहे.