केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुलकी सेवा प्राथमिक परीक्षा आज ठरल्यानुसार होत आहेत. परीक्षा पुढे ढकलण्यास काल सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. परीक्षार्थींनी इंग्रजी मजकुराबाबत उपस्थित केलेल्या आक्षेपाचे निराकरण झाल्याने परीक्षा स्थगित करण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचे कोर्टाने सांगितले. आजच्या परीक्षेत देशभरातून एकूण ९ लाख परीक्षार्थी आहेत.