>> बोगस ॲमेझॉन कॉल सेंटर प्रकरण
गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने कोलवाळ येथील बोगस ॲमेझॉन कॉल सेंटर प्रकरणी अटक केलेल्या मुख्य सूत्रधार जिगर परमार याला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने काल दिला. या प्रकरणातील इतर सर्व संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
गुन्हा अन्वेषण विभागाने कोलवाळ येथील बोगस ॲमेझॉन कॉल सेंटरवर छापा घालून मंगळवारी 33 जणांना अटक केली होती. या प्रकरणी मुख्य सूत्रधार जिगर परमार याची कसून चौकशी केली जात आहे. या बोगस सेंटरमधून किती जणांची फसवणूक करण्यात आली, यासंबंधी माहिती संकलित केली जात आहे.