लोहखनिज उत्खनन खटल्याच्या सुनावणीस गोवा राज्यातर्फे कोणीही उपस्थित राहीला नसल्याने काल राष्ट्रीय हरित लवादाने गोव्याच्या मुख्य सचिवांविरुद्ध जामीनपत्र वॉरंट जारी केले. गोव्यात खाणग्रस्त क्षेत्राच्या पुनर्वसनाविषयी गोवा उत्साही दिसत नाही, अशी टीपण्णीही लवादाने केली.
न्या. यू. डी. साळवी यांनी हे वॉरंट जारी केले. गोवा पर्यावरण संरक्षण संघर्ष समितीने डिचोलीत खाणग्रस्त क्षेत्रात पुनर्वसन होण्यासाठी लवादासमोर याचिका सादर केली असून त्याच्यावर सुनावणी चालू आहे. खाणींमुळे काय नुकसान झाले त्याचा आढावा घेण्याची मागणीही याचिकेत आहे. दरम्यान, एक खाणमालक एच. एल. नथुरमल यांनी लवादाला सांगितले की, खाणग्रस्त क्षेत्रात पुनर्वसनाच्या कामासाठी सरकारने आपणास मज्जाव केला आहे.