मुख्याधिकारी, कारकूनाविरुद्ध भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा नोंद

0
68

पेडणे पालिकेचे माजी मुख्याधिकारी कमलाकर हळर्णकर व वरिष्ठ लिपीक मदन शेणवी देसाई यांच्याविरुद्ध काल पोलिसांच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक शाखेने गुन्हा नोंद केला. त्यांना सोमवारी अटक केले जाण्याची शक्यता आहे. १५ मार्च २०१३ रोजी पेडणे येथील महेश पेडणेकर याच्याकडून फोटो स्टुडिओला ना हरकत दाखल्यासाठी ७०० रु. लाच मागितल्याचा त्यांच्यावर आरोप होता. वरिष्ठ कारकून देसाई यांच्यावर गुन्ह्यात मदत केल्याचा आरोप होता. याप्रकरणी चौकशी सुरू होती.