मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रालयात ‘मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी धोरणा’च्या अंमलबजावणीबाबत सर्व विभाग प्रमुखांची एक बैठक काल घेतली. या योजनेच्या विविध पैलूंवर चर्चा केल्यानंतर अंमलबजावणीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या. सरकारी आणि खासगी क्षेत्रात 5 हजार शिकाऊ उमेदवारांची भरती केली जाईल. सर्व विभागांना नॅशनल पोर्टल्सवर रिक्त जागा अधिसूचित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. येत्या 15 जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिनी तरुणांना ऑफर लेटर दिली जातील. या योजनेच्या माध्यमातून उद्योगांमध्ये शिकाऊ म्हणून सामील होऊन कमाई करताना शिकण्याची संधी प्राप्त होणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.