मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर डॉक्टरांचे आंदोलन मागे

0
2

माफीनाम्याचे प्रकरण मिटले; डॉक्टरांची सुरक्षा वाढवणार; गोमेकॉ इस्पितळ आवारात व्हिडिओग्राफीवर बंदी आणणार

अपमानास्पद वागणूक दिल्या प्रकरणी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी डॉ. रुद्रेश कुर्टीकर यांची माफी मागावी यासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळातील (गोमेकॉ) डॉक्टरांनी सुरू केलेले आंदोलन काल अखेर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्तक्षेपानंतर मागे घेतले. तत्पूर्वी, मुख्यमंत्र्यांनी गोमेकॉला भेट देऊन डॉक्टरांच्या शिष्टमंडळाशी दुसऱ्यांदा चर्चा केली आणि त्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. गोमेकॉमध्ये डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक व्यवस्था वाढविण्याबरोबरच इस्पितळातील आवारात व्हिडिओग्राफीवर बंदी घातली जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी गोमेकॉतील डॉक्टरांच्या संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

गोमेकॉच्या आपत्कालीन विभागील डॉ. रुद्रेश कुर्टीकर यांना अपमानास्पद वागणूक दिल्याने आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी त्यांची माफी मागावी यासाठी गोमेकॉतील डॉक्टरांनी सोमवारपासून आंदोलन सुरू केले होते. जाहीर माफी मागावी याकरिता सोमवारी आरोग्यमंत्र्यांना 24 तासांची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमेकॉतील डॉक्टरांच्या शिष्टमंडळासोबत सोमवारी संध्याकाळी एक बैठक घेऊन त्यांच्या मागण्या, समस्या जाणून घेतल्या होत्या. तसेच, मागण्यांची पूर्तता करण्याची ग्वाही दिली होती. तसेच, डॉक्टरांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. तथापि, डॉक्टरांनी आपले आंदोलन मागे घेतले नव्हते.

यानंतर मंगळवारी दुपारी मुख्यमंत्र्यांनी बांबोळी येथे गोमेकॉला भेट देऊन डॉक्टरांसोबत बैठक घेऊन विविध विषयांवर पुन्हा चर्चा केली. यावेळी आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांनी आरोग्यमंत्र्यांनी माफी मागावी, असे लिहिलेले फलक हातात धरले होते. गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांच्या कार्यालयात मुख्यमंत्र्यांनी गार्डचे प्रतिनिधी व इतर प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीला वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश पाटील, डॉ. रुद्रेश कुर्टीकर, गार्डचे अध्यक्ष डॉ. आयुष शर्मा व इतरांची उपस्थिती होती.

माफीनाम्याचे काय झाले?
आरोग्यमंत्री गोमेकॉमध्ये येऊन डॉ. रुद्रेश कुर्टीकर यांची माफी मागतील का? याकडे काहींचे लक्ष लागले होते, तर दुसरीकडे सरकारी अधिकारी आरोग्यमंत्र्यांकडून माफी मागण्याची मागणी कशी करू शकतो? याबद्दल वादावादी सुरू होती. त्याबाबत गोमेकॉतील डॉ. मधू घोडकिरेकर यांनी भूमिका स्पष्ट केली.
कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला कोणत्याही मंत्र्याला येऊन माफी मागण्यास सांगण्याचा अधिकार नाही, तो एक संवाद असला पाहिजे. आरोग्यमंत्र्यांनी सोशल मीडिया आणि एका चॅनलद्वारे माफी मागितली आहे, आम्ही ती स्वीकारतो; परंतु अधिकृतरित्या त्याची प्रत मिळण्याची आम्हांला उत्सुकता आहे, असे डॉ. मधू घोडकिरेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आरोग्यमंत्र्यांनी आपत्कालीन विभागात येऊन डॉक्टरांची माफी मागावी ही डॉ. रुद्रेश कुर्टीकर यांची मागणी वैयक्तिक नव्हती, तर ज्या खुर्चीवर ते बसले होते त्या खुर्चीचा मान राखण्यासाठी तो आग्रह होता, असेही डॉ. मधू घोडकिरेकर यांनी स्पष्ट केले.

व्हीआयपी हस्तक्षेपाशिवाय
उच्च दर्जाची आरोग्य सेवा देऊ

गोमेकॉमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला व्हीआयपी हस्तक्षेपाशिवाय योग्य आणि उच्च दर्जाची आरोग्य सेवा दिली जाणार आहे. दोन दिवसांच्या आंदोलनाच्या काळात देखील गोमेकॉतील सर्व सेवा सुरळीत सुरू होत्या, असे गार्डचे अध्यक्ष डॉ. आयुष शर्मा यांनी बैठकीनंतर बोलताना अपमानास्पद वागणूक दिल्या प्रकरणी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी डॉ. रुद्रेश कुर्टीकर यांची माफी मागावी यासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळातील (गोमेकॉ) डॉक्टरांनी सुरू केलेले आंदोलन काल अखेर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्तक्षेपानंतर मागे घेतले. तत्पूर्वी, मुख्यमंत्र्यांनी गोमेकॉला भेट देऊन डॉक्टरांच्या शिष्टमंडळाशी दुसऱ्यांदा चर्चा केली आणि त्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. गोमेकॉमध्ये डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक व्यवस्था वाढविण्याबरोबरच इस्पितळातील आवारात व्हिडिओग्राफीवर बंदी घातली जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी गोमेकॉतील डॉक्टरांच्या संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

गोमेकॉच्या आपत्कालीन विभागील डॉ. रुद्रेश कुर्टीकर यांना अपमानास्पद वागणूक दिल्याने आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी त्यांची माफी मागावी यासाठी गोमेकॉतील डॉक्टरांनी सोमवारपासून आंदोलन सुरू केले होते. जाहीर माफी मागावी याकरिता सोमवारी आरोग्यमंत्र्यांना 24 तासांची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमेकॉतील डॉक्टरांच्या शिष्टमंडळासोबत सोमवारी संध्याकाळी एक बैठक घेऊन त्यांच्या मागण्या, समस्या जाणून घेतल्या होत्या. तसेच, मागण्यांची पूर्तता करण्याची ग्वाही दिली होती. तसेच, डॉक्टरांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. तथापि, डॉक्टरांनी आपले आंदोलन मागे घेतले नव्हते.

यानंतर मंगळवारी दुपारी मुख्यमंत्र्यांनी बांबोळी येथे गोमेकॉला भेट देऊन डॉक्टरांसोबत बैठक घेऊन विविध विषयांवर पुन्हा चर्चा केली. यावेळी आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांनी आरोग्यमंत्र्यांनी माफी मागावी, असे लिहिलेले फलक हातात धरले होते. गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांच्या कार्यालयात मुख्यमंत्र्यांनी गार्डचे प्रतिनिधी व इतर प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. या बैठकीला वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश पाटील, डॉ. रुद्रेश कुर्टीकर, गार्डचे अध्यक्ष डॉ. आयुष शर्मा व इतरांची उपस्थिती होती.
माफीनाम्याचे काय झाले?
आरोग्यमंत्री गोमेकॉमध्ये येऊन डॉ. रुद्रेश कुर्टीकर यांची माफी मागतील का? याकडे काहींचे लक्ष लागले होते, तर दुसरीकडे सरकारी अधिकारी आरोग्यमंत्र्यांकडून माफी मागण्याची मागणी कशी करू शकतो? याबद्दल वादावादी सुरू होती. त्याबाबत गोमेकॉतील डॉ. मधू घोडकिरेकर यांनी भूमिका स्पष्ट केली.
कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला कोणत्याही मंत्र्याला येऊन माफी मागण्यास सांगण्याचा अधिकार नाही, तो एक संवाद असला पाहिजे. आरोग्यमंत्र्यांनी सोशल मीडिया आणि एका चॅनलद्वारे माफी मागितली आहे, आम्ही ती स्वीकारतो; परंतु अधिकृतरित्या त्याची प्रत मिळण्याची आम्हांला उत्सुकता आहे, असे डॉ. मधू घोडकिरेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आरोग्यमंत्र्यांनी आपत्कालीन विभागात येऊन डॉक्टरांची माफी मागावी ही डॉ. रुद्रेश कुर्टीकर यांची मागणी वैयक्तिक नव्हती, तर ज्या खुर्चीवर ते बसले होते त्या खुर्चीचा मान राखण्यासाठी तो आग्रह होता, असेही डॉ. मधू घोडकिरेकर यांनी स्पष्ट केले.

व्हीआयपी हस्तक्षेपाशिवाय
उच्च दर्जाची आरोग्य सेवा देऊ

गोमेकॉमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला व्हीआयपी हस्तक्षेपाशिवाय योग्य आणि उच्च दर्जाची आरोग्य सेवा दिली जाणार आहे. दोन दिवसांच्या आंदोलनाच्या काळात देखील गोमेकॉतील सर्व सेवा सुरळीत सुरू होत्या, असे गार्डचे अध्यक्ष डॉ. आयुष शर्मा यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी मानले डॉक्टरांचे आभार
आपल्या आवाहनाला अनुसरून डॉक्टरांनी आपले आंदोलन मागे घेतल्याने मुख्यमंत्र्यांनी गोमेकॉतील डॉक्टर आणि डॉ. रुद्रेश कुर्टीकर यांचे आभार मानले. डॉ. कुर्टीकर यांनी मोठ्या मनाने ही घटना विसरून जाऊन गोमेकॉमध्ये सहकाऱ्यांसमवेत सेवाकार्य करत राहावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

दक्षता समिती स्थापन होणार
आरोग्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक दक्षता समिती स्थापन केली जाणार आहे. व्हीआयपी संस्कृती बंद केली जाईल, अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये म्हणून गोमेकॉसाठी मार्गदर्शक तत्त्वे लागू केले जातील आणि रुग्णालयाच्या आतील भागात व्हिडिओग्राफी आणि छायाचित्रण करण्यास बंदी घातली जाईल. ही बंदी मंत्री आणि त्यांच्या मीडिया टीमला लागू होईल. डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य केल्या जातील, असेही मुख्यमंत्रत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एक सामंजस्य करारही करण्यात आला.

पोलीस उपनिरीक्षक नियुक्त करणार
गोमेकॉतील पोलीस चौकीवर एक उपनिरीक्षक नियुक्त केला जाणार आहे. तसेच, गोमेकॉतील विविध भागात सुरक्षा वाढविण्यासाठी 50 अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

‘तो’ व्हिडिओ पत्रकारांनी बनवला नाही : गुज
7 जून रोजी गोमेकॉच्या आपत्कालीन (कॅज्युअल्टी) कक्षात रेकॉर्ड केलेला डॉ. रुद्रेश कुर्टीकर यांचा व्हिडिओ कोणत्याही प्रसारमाध्यम कर्मचाऱ्यांनी बनवलेला नाही, तर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या सोशल मीडिया टीमने बनवला आहे, असे गोवा श्रमिक पत्रकार संघाचे (गुज) अध्यक्ष राजतिलक नाईक यांनी काल स्पष्ट केले. डिचोली येथील सामुदायिक आरोग्य केंद्राच्या (सीएचसी) प्रवेशद्वारावरील माध्यम प्रतिनिधींना प्रवेश नाही, असा फलक लावण्यात आला होता. पत्रकारांनी विरोध केल्यानंतर सदर वादग्रस्त फलक काढून टाकण्यात आला. गुजचे अध्यक्ष राजतिलक नाईक यांनी या फलकाचा निषेध केला.