मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानाविरुद्ध पाटणा न्यायालयात याचिका

0
8

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कामगार दिन सोहळ्यात गोव्यातील 90 टक्के गुन्ह्यांमध्ये बिहार, उत्तर प्रदेश व इतर राज्यातील स्थलांतरितांचा सहभाग असल्याच्या केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. डॉ. सावंत यांच्या विरोधात पाटणा बिहारामधील न्यायालयात एका व्यक्तीने याचिका दाखल केली आहे. बिहारमधील नेते मनीषकुमार सिंग यांनी पाटणा येथील न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मनीष सिंग यांनी डॉ. सावंत यांच्या वक्तव्याला आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत या बदनामीकारक वक्तव्याबाबत जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

भावना दुखावण्याचा हेतू नव्हता ः मुख्यमंत्री
जागतिक कामगारदिनी केलेल्या वक्तव्यामध्ये कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. माझ्या विधानामुळे नकळत कोणत्याही राज्यातील नागरिकांच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो, असा खुलासा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी काल केला.