मुख्यमंत्र्यांच्या आश्‍वासनानंतर शिर्डीतील बेमुदत बंद मागे

0
105

साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादातून पुकारण्यात आलेला बेमुदत शिर्डी बंद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चेचेआश्‍वासन दिल्यानंतर मागे घेण्यात आला. दरम्यान, या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज सोमवारी मुंबईत शिर्डी व पाथरीकरांची बैठक बोलावली आहे.

परभणीतील पाथरीचा साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून विकास करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर वादाला तोंड फुटले होते. त्याला आव्हान देत शिर्डीकरांनी काल रविवारपासून बेमुदत शिर्डी बंद पुकारला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी याप्रश्नी सकारात्मक चर्चा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामसभेत बंद मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, बंद मागे घेण्याचा निर्णय ग्रामसभेत झाल्यानंतर लगेचच शिर्डीतील दुकाने उघडण्यात आली. अन्य व्यवहारही पूर्वपदावर येत आहेत.
दरम्यान, शिर्डी बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. शिर्डीसह पंचक्रोशीतील गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. असंख्य भाविकांना बंदबाबत माहिती नव्हती. त्यामुळे शिर्डीत आलेल्या भाविकांची काल रविवारी आज मोठी गैरसोय झाली.