मुख्यमंत्र्यांचा गुजरातमधी राष्ट्रीय शिक्षण परिषदेत सहभाग

0
28

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली गुजरातमध्ये आयोजित विद्यालयीन शिक्षण या राष्ट्रीय पातळीवर परिषदेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सहभाग घेतला. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, विविध राज्याचे शिक्षण मंत्री आणि अधिकार्‍यांनी या परिषदेत सहभाग घेतला. या परिषदेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीला गती देण्याबाबत चर्चा करण्यात आली. गोव्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील सर्वोत्तम पद्धतींची अंमलबजावणी केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी म्हटले आहे. दरम्यान, या परिषदेपूर्वी डॉ. सावंत यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.